पिंपळे सौदागरमधील बीआरटी बसथांबे होताहेत चकाचक, स्थानिक नगरसेवकांचा पुढाकार
पिंपरी, ता. २८ - 'पीएमपीएमएल'च्या पिंपळे सौदागर परिसरातील बीआरटीएस (BRTS)थांब्यांची दुरवस्था झाली होती. या प्रभागातील नगरसेवकांच्या पुढाकाराने हे बसथांबे आता चकाचक झाले आहेत. नगरसेवकांनी पीएमपीएमएल प्रशासनाला सूचना देऊन हे बस थांबे पाण्याच्या फवाऱ्याने धुवून घेतले आहेत. स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काटे,अनिता काटे आणि कुंदा भिसे यांनी यासाठी पाऊल उचलले आहे.
गेल्या अनेत दिवसांपासून पिंपळे सौदागर परिसरातील बीआरटी थांब्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. थांब्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ, कचऱ्याने थांब्यांवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. थांब्यांची तोडफोड झाली होती. नागरीक या अस्वच्छतेतच वावरायचे. बीआरटी थांब्यांची ही परिस्थिती लक्षात आल्यावर
भारतीय जनता पक्षा तिन्ही स्थानिक नगरसेवकांनी तातडीने या विषयाचा पाठपुरावा केला. पीएमपीएमएल प्रशासनाला सूचना दिल्या व तातडीने या थांब्यांच्या स्वच्छतेचे व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
आता, या थांब्यांवरील कचरा उचलून, साचलेली धूळ मशीनच्या सहाय्याने स्वच्छ करुन आणि पाण्याचे फवारे मारून हे थांबे चकाचक केले जात आहेत. तसेच थांब्यांचे तुटलेले पत्रे बसवले जात आहेत.