बुधवार पेठेत पोलिसांचा छापा, सहा बांगलादेशी महिला ताब्यात

बुधवार पेठेत पोलिसांचा छापा, सहा बांगलादेशी महिला ताब्यात

बुधवार पेठेत पोलिसांचा छापा, सहा बांगलादेशी महिला ताब्यात 

पुणे, ता. २५ -  बुधवार पेठेत फरासखाना आणि खडक पोलिसांनी शनिवारी (ता. २३) मध्यरात्री छापा टाकला. सागर इमारतीतून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले.  

परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांना बुधवार पेठ परिसरात काही बांगलादेशी महिला बेकायदा राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सागर इमारतीवर छापा टाकला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांना सुरुवातीला ब्युटी पार्लर, शिवणकाम किंवा घरकामाचे आमिष दाखवून भारतात आणले होते, असे या महिलांनी चौकशीत सांगितले. बुधवार पेठेत आल्यानंतर या महिला वेश्याव्यवसायात आल्याचे तपासात समोर आले. 

आता, या महिलांना भारतात कोणी व कसे आणले, याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून आत्तापर्यंत परिमंडळ - १ मध्ये १०३ बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे व त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories