पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, आठवडाभरात तिसऱ्यांदा दरवाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, आठवडाभरात तिसऱ्यांदा दरवाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, आठवडाभरात तिसऱ्यांदा दरवाढ 

पुणे, ता. २५ - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा शनिवारी (ता. २३) वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, पेट्रोल आणि पॉवर पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ९० पैशांची, तर डिझेलच्या दरात ९५ पैशांची वाढ झाली आहे. त्यानुसार, पेट्रोलचा प्रतिलिटर दर १०८.७९, पॉवर पेट्रोलचा प्रतिलिटर दर  ११७.८० रुपये व डिझेलचा प्रतिलिटर दर ९५.३४ रुपये झाला आहे. 

यापूर्वी १५ आणि १९ मे रोजी दरवाढ करण्यात आली होती. १५ मे रोजी पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.९८ रुपये, पॉवर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ११५.९९ रुपये व डिझेलचा दर प्रतिलिटर ९३.४५ रुपये होता. १९ मे रोजी दरवाढ झाल्यानंतर पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०७.८९ रुपये, पॉवर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ११६.९० रुपये व डिझेलचा दर  प्रतिलिटर ९४.३९ रुपये होता.

जागतिक राजकीय अस्थिरता, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन, तेल कंपन्यांचा वाहतूक व वितरण खर्च, इंधन वितरण साखळीतील अडथळे ही इंधन दरवाढीची प्रमुख कारणे आहेत. आठवडाभराच्या कालावधीत ही इंधन दरवाढ तिसऱ्यांदा झाली आहे. वाढत्या महागाईमध्ये इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरीकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. नागरीकांत नाराजीचा सूर आहे. इंधन दरवाढीविरोधात आंदोलन पुकारली जात आहेत.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories