news
clock
ओव्हरटेक करताना अपघात, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

ओव्हरटेक करताना अपघात, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

ओव्हरटेक करताना अपघात, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

पिंपरी, ता. ६ - समोरच्या ओव्हरटेक करताना करकचून ब्रेक लावल्याने दुचाकी घसरुन बसखाली आली आणि दुचाकीस्वाग गंभीर जखमी झाला व मागे बसलेला तरुण मरण पावला. हा अपघात रहाटणी परिसरात ३ एप्रिलला घडला आहे. आरोपी दुचाकीस्वारावर रविवारी (ता. ५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागेश लक्ष्मण गायकवाड (वय २८), व्यवसाय पीएमटी बस चालक, हे एमएच १२ वायबी ३७०५ क्रमांकाची बस घेऊन रहाटणी येथील शिवार चौक परिसरातून जात होते. त्यावेळी एमएच १५ डीझेड २४२६ या क्रमांकाच्या पॅशन प्रो दुचाकीवरील चालक अभिषेक पुंडलीक शेरमाळे (वय २६) याने बीआरटी लेनमध्ये ‘नो एन्ट्री’ असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करून निष्काळजीपणे वाहन चालवले.

समोरील चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करताना समोरुन येणारी बस पाहून दुचाकी चालकाने अचानक ब्रेक लावल्याने गाडी घसरली आणि बसखाली जाऊन जोरात धडकली. या अपघातात दुचाकी चालकाचा उजवा पाय फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला, तर मागे बसलेला सागर भागवत देवरे (वय ३०) यांचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(बी), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories