स्पॉट 18 मॉलजवळ व्यावसायिकावर हल्ला; 3 तोळ्यांची सोनसाखळी गहाळ

स्पॉट 18 मॉलजवळ व्यावसायिकावर हल्ला; 3 तोळ्यांची सोनसाखळी गहाळ

काळेवाडी | 8 सप्टेंबर 2026 : स्पॉट 18 मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ व्यावसायिकासह त्याच्या मित्रावर लाकडी दांडके आणि लोखंडी वस्तूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मारहाणीदरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील अंदाजे 3 तोळे वजनाची सोनसाखळी गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ही घटना मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. अमरसिंग गुरमितसिंग अदियाल (वय 44, रा.पिंपळे गुरव ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, परशुराम धोत्रे रा.गोखलेनगर, पुणे आणि त्याच्या तीन साथीदारांनी फिर्यादी तसेच त्यांच्या मित्राला अडवले. त्यानंतर लाकडी दांडके आणि लोखंडी वस्तूने मारहाण केल्याचा आरोप आहे.

हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मित्राच्या डाव्या डोळ्याजवळ, छातीवर आणि नाकावर मार लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीदरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील सोनसाखळी पडून गहाळ झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 436/2026 नोंदवण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories