चिखली | 7 सप्टेंबर 2026 : देहू-आळंदी रोडवरील एम. बी. ट्रान्सपोर्टच्या कार्यालयाबाहेर एका व्यावसायिकावर लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. कान, खांदा, हात आणि पाठीवर प्रहार झाल्यामुळे व्यावसायिक गंभीर जखमी झाल्याचा आरोप आहे.
महेशकुमार मनोहर भिसे वय 56, रा. निगडी प्राधिकरण यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास रवीरंजन वजनकाट्याजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी त्यांच्या कार्यालयातून बाहेर येत होते. त्यावेळी कार्यालयासमोर उभ्या असलेल्या ट्रकमधील क्लिनर सीटवर आरोपी बसला होता. आरोपीने हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डाव्या कानावर प्रहार केला.
त्यानंतर उजवा खांदा, हात आणि पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी महादेव पिराजे बलाडे वय 38 याच्याविरोधात गुन्हा दाखल आला आहे.
चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 633/2026 दाखल असून, पुढील तपास सुरू आहे.