म्हाळुंगे | 6 सप्टेंबर 2026 : घरगुती वादाचा राग मनात धरून 60 वर्षीय महिलेला काठीने मारहाण करून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना खराबवाडीतील धाडगे वस्तीमध्ये घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास घडली. तक्रारीनुसार, फिर्यादी महिलेचा मुलगा पत्नी आणि नात असे घरी असताना आरोपी तेथे आले. जुन्या घरगुती वादाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी महिलेला काठीने मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी ओंकार लहू वाघुले, आकाश संतोष धाडगे आणि सागर साळू घोडे सर्व रा.खराबवाडी यांच्याविरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 132/2026 नोंदवण्यात आला आहे. घटनेमागील वादाचे नेमके कारण आणि मारहाणीची परिस्थिती याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.