चाकण | 7 सप्टेंबर 2026 : ‘रिक्षा व्यवस्थित चालवता येत नाही का?’ असे म्हणत दोन जणांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना बालाजीनगर परिसरात घडली. एका आरोपीने हातातील धातूच्या कड्याने प्रहार केल्यामुळे चालकाच्या डाव्या डोळ्याखाली दुखापत झाली.
ही घटना रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास बालाजीनगरमधील अल्कलाईन कॉलनीसमोर घडली. मधुकर केरबा पुरी गोसावी (वय 59, व्यवसाय—रिक्षाचालक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, रविंद्र सुरेश शिंदे आणि अरविंद शंकर शिंदे यांनी रिक्षा चालवण्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. आरोपींनी शिवीगाळ केल्यानंतर एका आरोपीने फिर्यादीच्या डाव्या गालावर हाताने मारहाण केली. त्याच्या हातातील कड्यामुळे डाव्या डोळ्याच्या पापणीवर दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 114/2026 नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.