देहूरोड परिसरात गोवंश छळाची घटना, तीन आरोपी अटक

देहूरोड परिसरात गोवंश छळाची घटना, तीन आरोपी अटक

देहूरोड परिसरात गोवंश छळाची घटना, तीन आरोपी अटक

पिंपरी, ता. १८ - देहूरोड  परिसरात चारचाकी गाडीमध्ये चार जरशी गायी रस्सीने बांधून कत्तलीसाठी नेणाऱ्या तीन आरोपींना देहूरोड पोलिसांनी रविवारी (ता. १७) अटक केली आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची नावे योगेश धनराज द्रविड (वय ३६, मॅकॅनिक), स्वरुप बरनाबोस मुनगंडा (वय २६, मजुरी) आणि सुर्याबा झेंडे (वय २८) ही आहेत. ते तिघे शितळानगर, देहूरोड येथील रहिवासी आहेत. आरोपींच्या आय टेन कंपनीच्या गाडीमध्ये जरशी गोवंशांना रस्सीच्या साहाय्याने क्रूर अवस्थेत बंदिस्त करून नेले जात होते. या वेळी गाडीत जागा खूप कमी होती आणि प्राण्यांना पाणी किंवा चारा दिलेला नव्हता.

आरोपींविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पशु संरंक्षण अधिनियम १९७६ कलम ४, ४(३७), ४(पि), प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११(१) तसेच भारतीय दंड संहिता कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories