शहरात जनगणनेचे काम वेगात सुरु, अधिकाऱ्यांची माहिती
पिंपरी, ता. २५ - जनगणनेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून 6 हजार 702 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांची माहिती संकलित करत आहेत. एक कर्मचारी एका दिवशी तब्बल 50 घरांपर्यंत पोहोचत आहे. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना नागरीकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे महापालिकेने केले आहे.
जनगणना अचूकरित्या पार पाडण्याची मोठी जबाबदारी प्रगणकांवर आहे. हे प्रगणक उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हातही घरोघरी जाऊन आपली जबाबदारी पार पाडत आहेत. नागरीकांना ३४ प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, अनेक नागरिक सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करत आहेत. नागरिक त्यांची ओळखपत्रेदेखील तपासली जात आहेत. नागरीकांनी दिलेली सर्व माहिती ही गोपनीय असणार आहे, हे महापालिका व प्रगणकांकडूनही नागरीकांना सांगितले जात आहे.
डीजीटल पद्धतीने जनगणना करणे सोपे झाले आहे, उन्हाचा कडाका लक्षात घेऊन सकाळी व ऊन उतरल्यावर जनगणना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, प्रगणकांकडे ओळखपत्र असल्याने जनगणनेसाठी नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.