स्कूल बस व व्हॅन्सची सर्व आवश्यक कागदपत्रे तातडीने अद्ययावत, वैध करुन घ्यावीत, 'आरटीओ'चे आवाहन

स्कूल बस व व्हॅन्सची सर्व आवश्यक कागदपत्रे तातडीने अद्ययावत, वैध करुन घ्यावीत, 'आरटीओ'चे आवाहन

स्कूल बस व व्हॅन्सची सर्व आवश्यक कागदपत्रे तातडीने अद्ययावत, वैध करुन घ्यावीत, 'आरटीओ'चे आवाहन

पिंपरी, ता. २५  - लवकरच शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि स्कूल व्हॅन मालक व चालकांनी आपल्या वाहनांची सर्व आवश्यक कागदपत्रे तातडीने अद्ययावत आणि वैध करुन घ्यावीत, असे आवाहन आरटीओने केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आरटीओ कार्यालयाने सांगितले आहे. 

शालेय वाहतूकीच्या गाड्यांना  आरटीओकडून मंजूर असलेला वैध शालेय वाहतूक परवाना, अपघाती संरक्षणासाठी वैध इन्शुरन्स पॉलिसी, वाहन चालवण्याचा वैध परवाना, बिल्ला असणे सक्तीचे आहे. वाहनामध्ये चालू स्थितीतील अग्निशामक यंत्र आणि प्रथमोपचार पेटी, वाहनाचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड गव्हर्नर यंत्र बसवणे बंधनकारक आहे. प्रत्येक शालेय वाहनावर 'स्कूल बस' असे ठळकपणे लिहिलेले असले पाहिजे.  शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी बसमध्ये महिला मदतनीस, चालकाची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी केलेली असावी. शाळा सुरु झाल्या की, स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी करण्यासाठी विशेष वायुवेग पथके देखरेख करणार आहेत. या तपासणीदरम्यान कागदपत्रे अपूर्ण आढळल्यास किंवा कोणत्याही कायदेशीर नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्यास, प्रशासकीय नियमांनुसार थेट कडक कारवाई केली जाईल, असे आरटीओ कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

याबाबत, पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव म्हणाले, ''विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि ऐनवेळी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व शाळा प्रशासन, वाहतूकदार आणि वाहन चालकांनी शाळा सुरु होण्याच्या मुदतीपूर्वी आपल्या आवश्यक विविध शासकीय कागदपत्रांचे नूतनीकरण करावे. कारवाईची वेळ येऊ देऊ नये. प्रशासनाला सहकार्य करावे.'' 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories