news
clock
सोनसाखळी चोराला ४८ तासात अटक, ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त, वाकड पोलीसांची कामगिरी

सोनसाखळी चोराला ४८ तासात अटक, ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त, वाकड पोलीसांची कामगिरी

सोनसाखळी चोराला ४८ तासात अटक, ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त, वाकड पोलीसांची कामगिरी 

पिंपरी, ता. १४ - सुमारे १५० सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण करुन वाकड पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास दोनच दिवसांत अटक केली आहे. आरोपीकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहे व ४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सचिन मानसिंग चव्हाण (वय २७ वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी बोडके वस्ती माण येथील रहिवासी आहे.

८ एप्रिलला सकाळी एक महिला  थेरगाव गणेश मंदिर परिसरात मॉर्निंग वॉक करत असताना एका जांभळ्या पांढऱ्या रंगाचे मोपेड गाडीवरुन आलेल्या अनोळखी इसमाने त्यांचे गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण जबरीने हिसका मारुन नेले व तो भूमकर चौकाच्या दिशेने भरधाव वेगाने निघून गेला.  याबाबत फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन अनोळखी चोरट्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना वाकड पोलिसांच्या तपास पथकाने  सलग दोन दिवस घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे निरीक्षण केले. 

तपासात अनोळखी आरोपीने चोरी करण्यासाठी येतानाचा व जातानाचा मार्ग निश्चित केला असल्याचे लक्षात आले. त्यानुसार हिंजवडी-माण येथील (बोडके वस्ती, माण रस्ता)  एचपी पेट्रोल पंपाजवळ संशयित आरोपीला १० एप्रिलला ताब्यात घेतले. सचिन मानसिंग चव्हाण (वय २७ वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे केलेल्या तपासात आरोपीकडून वाकड पोलीस ठाण्यात नोंद असलेले दोन चेन चोरीचे  गुन्हे व चतुः श्रृंगी पोलिस ठाण्यात नोंद असलेला वाहन चोरीचा १ गुन्हा उघडकीस आला आहे. 

आरोपीकडून गुन्हा करण्याकरिता वापरलेल्या एक होंडा युनिकॉर्न मोटार सायकल, एक होंडा अॅक्टिवा स्कुटर व गुन्ह्यातील चोरीस गेलेली २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ४,७५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सचिन मानसिंग चव्हाण हा यापूर्वी चतुः श्रृंगी वाहतूक विभागात ट्रॅफिक वार्डन म्हणून कामास होता, परंतु त्याची वर्तणूक चांगली नसल्याने त्यास ७ महिन्यापूर्वी कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर सदर आरोपीने मार्च २०२६ दरम्यान वाहतूक विभागाजवळ डिटेन करुन ठेवलेल्या दुचांकीमधील एक होंडा आक्टिवा स्कूटर चोरी केली होती व त्याचा वापर चेन चोरीसाठी केलेला होता, त्याचेकडून सदर गाडी जप्त करुन नमूद वाहन चोरीचा गुन्हा उघड केला आहे.

सदर कारवाई  ही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, शशीकांत महावरकर (पोलीस सह आयुक्त), बसवराज तेली  (अप्पर पोलीस आयुक्त), सारंग आव्हाड (अप्पर पोलीस आयुक्त), विशाल गायकवाड (पोलीस उप आयुक्त, परि-२),  सुनिल कुहाडे (सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग) यांच्या मार्गदर्शनाने वाकड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग,  पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील,  सहाय्यक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख, श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक विभीषण कन्हेरकर, सपोफौ संदीप गवारी, पोहवा. वंदु गिरे, पोहवा साबळे, पोहवा. घाडगे, पो.हवा. वडेकर, पो.हवा. भुसारे, पोशि तात्यासाहेव शिंदे, पोशि झेंडे, पोशि. कौतेंय खराडे, पोलिस शिपाई विक्रम भगत, कांबळे, मांडे व गायके यांनी केली आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories