चाकण दक्षिण पोलिस स्टेशन हद्दीतून २३ किलो गांजासह १२ लाखांचा मु्द्देमाल जप्त, तिघांना अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

चाकण दक्षिण पोलिस स्टेशन हद्दीतून २३ किलो गांजासह १२ लाखांचा मु्द्देमाल जप्त, तिघांना अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

चाकण दक्षिण पोलिस स्टेशन हद्दीतून २३ किलो गांजासह १२ लाखांचा मु्द्देमाल जप्त, तिघांना अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

पिंपरी, ता. २९ -  पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण दक्षिण पोलिस स्टेशन हद्दीतून ३ आरोपीकडून २३ किलो ५३८ ग्रॅम वजनाचा गांजा, ०३ मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १२,१०,५००/- किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. 

 पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी व त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी  पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेश दिले आहे. त्यानुसार, पोलिस उप आयुक्त गुन्हे प्रदिप जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २  प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी वेगवेगळी पथके तयार केली. 

 अंमली पदार्थ विरोधी पथकाला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना २७ मे चाकण दक्षिण पोलिस स्टेशन हद्दीत शेलपिंपळगाव येथे हॉटेल वैष्णवीसमोर, शिक्रापुर चाकण हायवे रोडलगत सार्वजनिक ठिकाणी ३ संशयास्पद इसम आढळले. त्यांच्याकडून २३ किलो ५३८ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ ३ मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १२ लाख १० हजार ५००/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.  

 १) संदिप भगवान हांडे (वय २८ वर्षे, रा. खराबवाडी ता. खेड), २) गणेश सुरेश तारु (वय ३० वर्षे, रा. खराबवाडी ता. खेड), ३) रिहान वसिम शेख (वय १९ वर्षे, रा. खंडोबामाळ, चाकण, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्यावर चाकण दक्षिण पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) २० (ब) (ii) (क) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

ही कारवाई  पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड,  पोलिस उप आयुक्त गुन्हे  प्रदिप जाधव, सहा पोलिस आयुक्त, गुन्हे २ -  प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड, हवालदार/१७०६ निखिल शेटे, पोहवा/१९१६ विजय दौंडकर, पोशि/२०९८ सदानंद रुद्राक्षे, पोलिस शिपाई/२१३६ गोविंद डोके, पोशि २३८१ निखिल वर्षे, पोशि/२६४२ संतोष सपकाळ, पोशि/२९७७ चंद्रकांत जाधव यांच्या पथकाने केली. तांत्रिक विश्लेषणसाठी सहाय्यक पोलिस फौजदार नागेश माळी, पोहवा/३०६८ प्रकाश ननावर पोशि/२४३०/सुभाष गुरव यांनी मदत केली आहे.

अंमली पदार्थाच्या संदर्भात कोणतीही माहीती मिळाल्यास त्यांनी पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाशी ८६००००२३२० या क्रमांकावर, पोलिस हेल्पलाईन ११२ क्रमांकावर किंवा मानस हेल्पलाईन - १९३३ या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच [email protected] या संकेतस्थळावरही संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories