चाकण-तळेगाव परिसरातील वाहतूककोंडी लवकरच संपणार, ४ नवे पर्यायी बाह्यवळण मार्ग होणार

चाकण-तळेगाव परिसरातील वाहतूककोंडी लवकरच संपणार, ४ नवे पर्यायी बाह्यवळण मार्ग होणार

चाकण-तळेगाव परिसरातील वाहतूककोंडी लवकरच संपणार, ४ नवे पर्यायी बाह्यवळण मार्ग होणार

पिंपरी, ता. १२ ऑगस्ट २०२६ - पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे तसेच राज्याचे प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या चाकण आणि तळेगाव पट्ट्यातील वाहतूककोंडी सोडवणे ही आता काळाची गरज आहे. याच अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA)एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘चाकण डेडलॉक वर्क’अंतर्गत पुणे-नाशिक महामार्गावरील (NH-60) वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी ४ नवे पर्यायी बाह्यवळण मार्ग (बायपास) प्रस्तावित करण्यात आले असून, त्यांच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगात सुरू आहे, अशी माहिती 'पीएमआरडीए'कडून देण्यात आली आहे.


📊 प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

🔹 एकूण मंजूर निधी : ₹१००.१४ कोटी (प्रशासकीय मान्यता प्राप्त)

🔹 प्रमुख रस्ते : एकूण ७ प्रजिमा, डीपी व एमआयडीसी रस्त्यांचा विकास (१७.०५ किमी)

🔹 कामाची सद्यस्थिती : २७ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यारंभ आदेश (Work Order) देण्यात आले असून, सध्या सर्व कामे प्रगतीपथावर आहेत!

🔹 उद्दिष्ट : विहित वेळेत, म्हणजेच पुढील १२ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन.

📍 कोणते ४ नवे बायपास प्रस्तावित आहेत?

१️. हिंगणे चौक ते खराबवाडी: (०.९०० किमी) - फोक्सवॅगन कंपनी आणि MIDC टप्पा २ व ३ मधील वाहतूक थेट पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा मार्ग.

२️. सॅनी कंपनी ते समृद्धी सीएनजी पंप (नाणेकरवाडी): (१.२०० किमी) - मुख्य चाकण चौकावरील अवजड वाहतुकीचा ताण कमी करणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता.

३️. बंगला वस्ती चौक ते रासे फाटा (मेदनकरवाडी): (२.५०० किमी) - पुणे शहर आणि तळेगावला थेट रासे फाटा येथील शिक्रापूर राज्य मार्गाशी जोडणारा दुवा.

४️. पश्चिम बाह्यवळण मार्ग: (०.८५० किमी) - पुणे-नाशिक महामार्गावरून थेट चाकण एमआयडीसी टप्पा ५ ला जोडणारा ४५ मीटर रुंदीचा प्रशस्त मार्ग.

प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन.....

“प्रस्तावित चार बाह्यवळण मार्गांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतीत आहे. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आमचे नियोजन असून, त्यानंतर औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीचा प्रश्न बहुतांशी निकाली निघेल. ”

— शिवकुमार कुपल, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories