चांदखेड येथे फोन-पे खात्यातून ५० हजारांचा अपहार, दोघांविरोधात गुन्हा दाखल
Apr 10 2026
45
चांदखेड येथे फोन-पे खात्यातून ५० हजारांचा अपहार, दोघांविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १० - एका मजुराच्या मोबाईलमधील पॅटर्न व पासवर्डचा गैरवापर करुन फोन-पे खात्यातून ५०,००० रुपये काढून फसवणूक केल्याची घटना ७ एप्रिलला चांदखेड (ता. मावळ) येथे घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जितराम बुनकर (वय ३९, व्यवसाय मजुरी, सध्या रा. चांदखेड, ता. मावळ; मूळ रा. जेष्ठाहटोला, जि. सतना, मध्यप्रदेश) यांच्या मोबाईलचा पासवर्ड व पॅटर्न वापरुन आरोपींनी त्यांच्या परस्पर फोन पे खात्यातून ५०,००० रुपये काढले.
या प्रकरणी बाबुलाल यादव (वय २४, रा. बनचंचर, जि. शहडोल, मध्यप्रदेश) आणि नारायणदास यादव (वय २१, रा. शहडोल, मध्यप्रदेश) या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी अद्याप अटक नाहीत. पोलिस तपास करत आहेत.