चऱ्होलीत डिझेल चोरीच्या आरोपातून ड्रायव्हरला मारहाण; गुन्हा दाखल

चऱ्होलीत डिझेल चोरीच्या आरोपातून ड्रायव्हरला मारहाण; गुन्हा दाखल

दिघी | १८ ऑक्टोबर २०२६ : गाडीतील डिझेल चोरल्याचा आरोप करत एका ड्रायव्हरला शिवीगाळ आणि दमदाटी करून पाण्याच्या काळ्या पाईपने मारहाण केल्याची घटना चऱ्होली बुद्रुक परिसरात घडली. या मारहाणीत ड्रायव्हरच्या दोन्ही पायांना आणि डाव्या खांद्याला दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चऱ्होली बुद्रुक येथील पठारे मळा, पठारे वस्ती चौक परिसरात ही घटना घडली.

या प्रकरणी नितीन प्रभाकर लकडे (वय ३५ वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, सध्या रा. सहकारनगर क्रमांक २, मूळ जि. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, अमोल रामभाऊ कनकाटे (वय ४० वर्षे, रा. कोरेगाव मूळ, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) याने फिर्यादीला गाडीतील डिझेल चोरीबाबत जाब विचारला.

‘तू माझ्या गाडीतील डिझेल का चोरले?’ असे म्हणत आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पाण्याच्या काळ्या पाईपने फिर्यादीच्या दोन्ही पायांवर आणि डाव्या खांद्यावर मारहाण करून जखमी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories