news
clock
बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी, ता. ३१ - मालमत्तेची बनावट कागदपत्रे सादर करुन ती बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० ऑगस्ट २०१९ ते १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत वडमुखवाडी-चऱ्होली येथे ही घटना घडली आहे. 

याबाबत, फिर्यादी पार्वती बाळासाहेब कोरडे (वय ६५ वर्षे, रा. वडमुखवाडी) यांनी तक्रार दिली आहे. आरोपींमध्ये विजया पांडुरंग कोरडे (वय ७५ वर्षे), संपत पांडुरंग कोरडे (वय ५८ वर्षे ), बाई पांडुरंग कोरडे (वय ५० वर्षे ), ज्ञानेश्वर कुशाबा कोरडे (वय ६९ वर्षे), सोमनाथ बाळासाहेब कोरडे (वय ४१ वर्षे) आणि सुनिता संतोष दळवी (वय ४३ वर्षे), सर्व रा. वडमुखवाडी यांचा समावेश आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

 आरोपींनी संगनमताने फिर्यादीच्या मालकीच्या जमिनीवर डोळा ठेवून, फिर्यादी व त्यांच्या पती यांच्या बनावट सह्या करून खोटे दस्तऐवज तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील नगररचना व विकास विभागाकडे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सादर करुन संबंधित जागेवरील हॉस्पिटल आरक्षणात फेरबदल करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४६५, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories