news
clock
देहूरोड परिसरात मारहाणीच्या घटनेत तरुण जखमी

देहूरोड परिसरात मारहाणीच्या घटनेत तरुण जखमी

देहूरोड परिसरात मारहाणीच्या घटनेत तरुण जखमी

पिंपरी, ता. २ - देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून मारहाणीच्या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २९) रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास बी.जी. शिर्के लेबर कॅम्प, बापदेवनगर, विकासनगर, किवळे येथे ही घटना घडली. फिर्यादी केशवकुमार विजय मिश्रा (वय ३४, व्यवसाय फॅब्रिकेशन) हे त्यांच्या मामे भावामधील चालू असलेला वाद सोडवण्यासाठी गेले असता, आरोपी विशाल जमदाडे (वय अंदाजे २५) याने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली व धमकी दिली.

यानंतर आरोपीने हातातील लोखंडी कड्याने फिर्यादीवर हल्ला करत त्यांच्या डाव्या हाताच्या कोपराजवळ, पाठीत व डोक्यावर वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत. तसेच फिर्यादीचे मामे भाऊ मनोज पांडे यांनाही पाठीवर मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories