मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे - भाऊसाहेब भोईर

मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे - भाऊसाहेब भोईर

 मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे - भाऊसाहेब भोईर

पिंपरी, ता. १० - महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी सर्व प्रशासकीय नियम धाब्यावर बसवून ५२ कोटींहून अधिक रकमेची बिले ठेकेदारांना परस्पर अदा केली आहेत. हा प्रकार म्हणजे महापालिकेच्या तिजोरीची लूट आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रवीण जैन आहेत. त्यांची सखोल चौकशी करावी व त्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी शुक्रवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत केली. 

 महापालिकेच्या स्थापत्य, पाणी पुरवठा, बीआरटी विभागांशी संबंधित सुमारे ७० कामांची बिले कोणत्याही अधिकृत मान्यतेशिवाय ठेकेदारांना देण्यात आली आहेत. स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभेची कोणतीही अधिकृत मंजपरी नसताना केवळ बोगस उपसूचनांचा आधार घेऊन ही देयके काढण्यात आली. संबंधित नगरसेवकांची दिशाभूल करुन त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या गेल्या, विभाग प्रमुखांना अंधारात ठेवले गेले, असा आरोप भोईर यांनी केला आहे. 

प्रवीण जैन यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी आक्रमक मागणी भोईर यांनी केली. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories