news
clock
आळंदी रोड परिसरात ९३ हजार २०० रुपयांचा गांजा जप्त

आळंदी रोड परिसरात ९३ हजार २०० रुपयांचा गांजा जप्त

आळंदी रोड परिसरात ९३ हजार २०० रुपयांचा गांजा जप्त

पिंपरी, ता. १० - आळंदी रोड (ता. खेड) परिसरात पीसीएस चौकात गुरुवारी (ता. ९) पोलिसांनी २१ वर्षीय युवकाकडून तब्बल ९३ हजार २०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत पोलिस शिपाई चंद्रकांत छबु जाधव यांनी फिर्याद दखल केली आहे. आरोपी ओम महेश गायकवाड (वय २१ वर्षे रा. बीड) याला पोलिसांनी अटक केली आहे. ओमच्या ताब्यात ९३,२००/- किंमतीचा १२६० ग्रॅम वजनाचा गांजा बाळगला होता. त्याच्याजवळ एक मोबाईल व बॅग आढळली आहे. 

आरोपीवर आळंदी पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (२) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories