'५२ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणामुळे' महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन सक्तीच्या रजेवर, आयुक्तांचा आदेश जारी
Apr 11 2026
13
'५२ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणामुळे' महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन सक्तीच्या रजेवर, आयुक्तांचा आदेश जारी
पिंपरी, ता. ११ - सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकामध्ये काही कामांचा समावेश नसतानाही महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी उपसूचनांच्या आधारे ५२ कोटींहून अधिक रकमेची बिले ठेकेदारांना परस्पर अदा केली आहेत, असा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुरुवारी (ता.९) विशेष चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी निष्पक्ष, पारदर्शक व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन यांना पुढील आदेश होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे, हा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आहे. महापालिकेच्या सर्व विभागांनाही याबाबत सूचित करण्यात आले आहे.
जैन यांच्या अनुपस्थितीत कार्यालयीन कामकाज सुरळीत राहावे यासाठी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा परीक्षक यांच्याकडे सोपविण्यात येत आहे, प्रमोद भोसले यांनी पदभार स्वीकारुन वित्तीय कामकाज, लेखा प्रक्रिया व संबंधित सर्व प्रशासकीय कार्ये नियमानुसार व प्राधान्याने पार पाडावीत, असे आदेशात नमूद केले आहे. सदर आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
- Chief Accounts Officer, Pravin Jain, forced leave
- 52 crore scam,
- Pimpri Municipal Corporation, financial irregularities
- चौकशी समिती, विशेष तपास,
- आयुक्त आदेश, डॉ विजय सूर्यवंशी
- मुख्य लेखा अधिकारी, प्रवीण जैन, सक्तीची रजा,
- आर्थिक गैरव्यवहार, मुख्य लेखा अधिकारी, प्रवीण जैन
- पिंपरी महापालिका, गैरव्यवहार प्रकरण, ५२ कोटी घोटाळा,