चिखलीत ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची ७.२४ लाखांची फसवणूक

चिखलीत ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची ७.२४ लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड | १६ ऑक्टोबर २०२६ : ट्रेडिंगच्या नावाखाली एका महिलेची ७ लाख २४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार चिखली परिसरात समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने महिलेकडून दोन वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठवून घेतल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ९ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत घडला. या प्रकरणी एका ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, अनोळखी व्यक्तीने ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेला पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर २ लाख रुपये पाठवले.

त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रमधील रमाकांत बर्मन यांच्या नावावरील खात्यावर ३ लाख ६२ हजार ९६२ रुपये पाठविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या व्यवहारांमधून आपली एकूण ७ लाख २४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादी महिलेने पोलिसांना सांगितले आहे.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८२६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२), ६१(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(ड) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories