वाकडमध्ये कारचालकाकडे दरमहा ५ हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप

वाकडमध्ये कारचालकाकडे दरमहा ५ हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप

वाकड | १६ ऑक्टोबर २०२६ : वाकड परिसरात एका कारचालकाला अडवून दरमहा पाच हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वाकडमधील भुजबळ चौक येथील डॉल्फिन ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर घडली.

या प्रकरणी शिवराज म्हाळप्पा हेगडे (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे.  फिर्यादीनुसार, शिवराज हे त्यांची इर्टिगा कार (एमएच १२ एसयू ७०३६) घेऊन रस्त्यावर थांबले असताना आरोपीने त्यांना अडवले. त्यानंतर आरोपीने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप आहे.

आरोपीने ‘तुला जर वाकड ब्रिज येथून पॅसेंजर घेऊन जायचे असेल, तर मला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल’, अशी मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी शुभम विशाल दुधभाते (वय २८, रा. भुजबळ चौक, वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपीने यापूर्वीही धमकावून दहा ते बारा हजार रुपये रोख आणि ऑनलाइन पद्धतीने घेतले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२७/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील खंडणीसह संबंधित कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कारंडे करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories