पती-पत्नीची एका महिलेला हाताने व लोखंडी रॉडने मारहाण, चिखलीतील घटना

पती-पत्नीची एका महिलेला हाताने व लोखंडी रॉडने मारहाण, चिखलीतील घटना

पती-पत्नीची एका महिलेला हाताने व लोखंडी रॉडने मारहाण, चिखलीतील घटना 

पिंपरी, ता. २१ - रस्त्यात कुत्र्याला खायला घालण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात पती-पत्नीने एका महिलेला हाताने व लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना संतपीठ रस्ता-पाटीलनगर चिखली येथे बुधवारी (ता. २०) घडली. 

संबंधित महिलेने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मारहाण करणारे पती-पत्नी रामदास भोसले व जयश्री भोसले यांना अटक केली आहे. फिर्यादी महिला चिखली परीसरातील संतपीठ रो रस्त्यावर कुत्र्यांना बिस्कीट व चिकन राईस खायला देत असताना त्या ठिकाणी राहणाऱ्या आरोपी पती-पत्नीने "तू येथे कुत्र्यांना काही खायला टाकू नको." असे म्हटले. यावरुन फिर्यादी व आरोपींचा वाद झाला आणि रामदास भोसले याने फिर्यादीच्या हातातील लोखंडी रॉड घेऊन फिर्यादीच्याच हातावर, पायावर मारले. जयश्री भोसले हिने फिर्यादीस हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. 

आरोपी पती-पत्नीवर चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५(२), ३५२,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories