कुदळवाडी-चिखली येथून ६ लाख १९ हजारांचा गुटखाजन्य माल जप्त

कुदळवाडी-चिखली येथून ६ लाख १९ हजारांचा गुटखाजन्य माल जप्त

कुदळवाडी-चिखली येथून ६ लाख १९ हजारांचा गुटखाजन्य माल जप्त 

पिंपरी, ता. १५ - कुदळवाडी-चिखली येथून ६ लाख १९ हजार ९८२ रुपयांचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखाजन्य माल अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी (ता. ४) जप्त केला आहे. आरोपींवर  अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय मधुकर शेळके (वय ३२ वर्षे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी १. रुस्तमखान, २. बाबरखान, ३. नबीखान, ४. वैभव अर्जुन यादव, ५. राजु श्रीवास्तव, ६. मनोजचौधरी (सर्व रा. पत्ते माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 सुगंधित तंबाखु, गुटखा, पानमसाला सुंगंधित स्वादिष्ट सुपारी व तत्सम पदार्थांचे महाराष्ट्रात उत्पादन साठा, वितरण किंवा विक्री यावर  बंदी घातलेली असताना,  आरोपींनी  संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेगवेगळया कंपनीचा  ६,१९,९८२/- रुपयांच्या गुटखाजन्य मालाचा विक्रीसाठी अनाधिकृत साठा केला होता. अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी कुदळवाडी-चिखली येथे विठ्ठल रुक्मिणी मंदीराजवळ छापा टाकून हे गुटखाजन्य पदार्थ जप्त केले. 

आरोपींवर चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३,२७४,२७५, ३ (५), व अन्न सुरक्षा व मानक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories