निगडीत तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, चौघे अटकेत
पिंपरी, ता. ५ - निगडी पोलिसांनी ओटास्कीम परिसरात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास सोमेश्वर मंदिरासमोरील संजय हॉटेल चौकाजवळील मोकळ्या जागेत आरोपी पैशांवर तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. या प्रकरणी माहुल बाबासाहेब जावळे (वय ३०), विजय बसू कांबळे (वय ३२), बाळासाहेब राजाभाऊ गालफाडे (वय ४२) आणि अजय नवनाथ शिरसाठ (वय ३१) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत, पोलिस शिपाई विशाल रंगनाथ म्हस्के यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींकडून ५२ पत्त्यांचा एक कॅट व २ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- cash seized, gambling material seized, accused names, Maharashtra Anti-Gambling Act, Section 12(a), Someshwar temple
- , three-card gambling, gambling den, police action, arrested
- महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, कलम 12(अ), Nagdi,
- रोख रक्कम जप्त, जुगार साहित्य जप्त, सोमेश्वर मंदिर, संजय हॉटेल चौक
- निगडी, पिंपरी, तीन पत्ती जुगार, जुगार अड्डा, पोलिस कारवाई, चौघे अटकेत