news
clock

हळद खरेदीच्या व्यवहारात ११.६५ लाखांची फसवणूक, चिखलीत गुन्हा दाखल

पिंपरी, ता. १२ - हळद खरेदीच्या व्यवहारातून ११ लाख ६५ हजार २७८ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यावसायिकाविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ जुलै २०२५ ते २९ जुलै २०२५ दरम्यान राजे शिवाजीनगर, चिखली येथील ‘हॉट अॅन्ड स्पायसी’ नावाच्या चायनिज सेंटरमध्ये घडली.

याबाबत चेतन मधुकर भोसले (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. ते सध्या सत्यम रेसिडेन्सी, फ्लॅट क्रमांक ३०३, प्लॉट क्रमांक ५७ येथे वास्तव्यास असून मूळचे चिंधवली (ता. वाई, जि. सातारा) येथील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद शांताराम सायगावकर (रा. रायगड, सध्या नवी मुंबई) यांनी त्यांच्या ‘गारवीन स्पायसेस अॅन्ड फूड प्रॉडक्ट कॉर्पोरेशन’ कंपनीसाठी फिर्यादींकडून हळद खरेदी करण्यासाठी करार केला होता. त्यानुसार भोसले यांनी आरोपीला एकूण १८ लाख ३५ हजार २७८ रुपयांचा माल दिला. त्यापैकी आरोपीने केवळ ६ लाख ७० हजार रुपये दिले. उर्वरित ११ लाख ६५ हजार २७८ रुपये न देता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६ (२) व ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories