news
clock
ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक

ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक

ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक

पिंपरी, ता. १२ : ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची तब्बल २७ लाख ७२ हजार ४७ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रवेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना २५ एप्रिल २०२४ ते १९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत निगडी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक २६ मधील शुभम पार्क परिसरात घडली. फिर्यादी यांच्या पत्नी सौ. अंजली उन्मेश कोलारकर यांना आरोपी अॅलेक्स विल्यम्स या इसमाने मोबाईल क्रमांक ८७९४६४२०२९ तसेच यूके येथील ४४७७७४९९३६७१ या क्रमांकावरुन संपर्क साधला.

आरोपीने विश्वास संपादन करून विविध ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली दिशाभूल केली. त्यानंतर पीडित महिलेकडून आयडीएफसी फर्स्ट बँक, कॉसमॉस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच भगिनी निवेदिता बँक या खात्यांमधून टप्प्याटप्प्याने एकूण २७,७२,०४७ रुपये ऑनलाईन पद्धतीने घेत फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories