news
clock
काळेवाडीतील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्यावी, नगरसेवक विनोद नढे यांचे पोलिसांना निवेदन

काळेवाडीतील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्यावी, नगरसेवक विनोद नढे यांचे पोलिसांना निवेदन

काळेवाडीतील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्यावी, नगरसेवक विनोद नढे यांचे पोलिसांना निवेदन 

पिंपरी, ता. १७ - काळेवाडी परिसरात अडीच वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेने शहरातील पालकावर्ग संतप्त झाला आहे. या प्रकरणातील आरोपी विजय भोसले याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक विनोद नढे यांनी केली आहे. या संदर्भात विनोद नढे यांनी काळेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. 

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक असून, या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून नागरिकांमध्ये तीव्र व्यक्त होत आहे. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांमध्ये काय‌द्याचा धाक निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला तातडीने न्याय मिळवून द्यावा,  विशेष सरकारी वकील नियुक्त करून आरोपीला कोणतीही कायदेशीर पळवाट मिळू नये, या आम्हा पालकांच्या आणि जबाबदार नागरीकांच्या मागण्या आहेत. 

या प्रकरणात तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होईल. त्यामुळे आरोपीवर लवकर कठोर कारवाई करावी, असे विनोद नढे यांनी प्रशासनाला सांगितले आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories