शंभराव्या आणि १०१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तयार केली जाणार व्यापक सल्लागार समिती
शंभराव्या आणि १०१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तयार केली जाणार व्यापक सल्लागार समिती
पुणे, ता. १७ - महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडली. त्यानंतर, नवीन कार्यकारिणीची पहिली संयुक्त बैठक मसापच्या पटवर्धन सभागृहात नुकतीच पार पडली. या बैठकीत येणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या नियोजनाबाबत व इतर काही विषयांबाबत चर्चा झाली. याबाबतची माहिती परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शंभराव्या आणि १०१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी व्यापक सल्लागार समिती तयार केली जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेवर निवडून आलेल्या सदस्यांसह बाहेरचे सदस्य यांचा समावेश असणार आहे. तसेच शंभराव्या साहित्य संमेलनापूर्वी राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने शहरात ९९ ठिकाणी एक दिवसीय पुस्तक प्रदर्शन किंवा साहित्य संमेलन घेतले जाणार आहे. यामध्ये एनबीटीतर्फे फिरत्या ग्रंथालयाची बस उपलब्ध असेल, सर्व खर्च एनबीटी करणार आहे, असे सोमण यांनी सांगितले.
सोमण म्हणाले, ''महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणुकीनंतर या पहिल्या बैठकीत उपाध्यक्ष आणि विश्वस्त पदावरील नियुक्ती केली जाणार होती, पण अनेक ठिकाणची नावे अजून आलेली नाहीत. त्यामुळे ही नियुक्ती झाली नाही. या पदावर नियुक्ती करताना नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. साहित्य पत्रिकेच्या संपादकपदी प्रकाश देशपांडे, विभागीय कार्यवाह पदी जयंत येलूरकर आणि संजीव गिरासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कायदे सल्लागार म्हणून केदार सोमण यांची निवड करण्यात आली.''
पंचवार्षिक निवडणुकीनंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेची पहिली संयुक्त बैठक मसापच्या पटवर्धन सभागृहात पार पडली. या बैठकीला प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदिप निफाडकर यांच्यासह स्थानिक कार्यवाह व जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.
- राष्ट्रीय पुस्तक न्यास, National Book Trust (NBT), पुस्तक प्रदर्शन, Book Exhibition, फिरते ग्रंथालय, Mobile Library,
- सल्लागार समिती, Advisory Committee,
- , योगेश सोमण, Yogesh Soman, साहित्य संमेलन, Literary Conference
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan
- महाराष्ट्र साहित्य परिषद, Maharashtra Sahitya Parishad