चिंचवडमध्ये बंदी असलेल्या गुटखा-पानमसाल्याचा साठा, तरुणाला अटक
पिंपरी, ता. २८ - चिंचवड परिसरात बंदी असलेल्या गुटखा व पानमसाल्याची विक्री करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली. कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण ६,९४१ रुपयांचा बंदी घालण्यात आलेला पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केली असून आरोपीला अटक केली आहे.
सदर कारवाई शुक्रवारी (ता. २७) दुपारी सुमारे १२.३० वाजता वाल्हेकरवाडी येथील शुभम गार्डन मंगल कार्यालयाबाहेरील लक्ष्मी पान शॉप येथे करण्यात आली. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. २७) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठा व विक्रीवर शासनाने बंदी घातलेली असतानाही आरोपी राहुल कुमार अशोक मिश्रा (वय ३२, रा. वाल्हेकरवाडी) याने आपल्या दुकानात प्रतिबंधित पदार्थांचा साठा करून विक्रीसाठी ठेवला होता.
कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण ६,९४१ रुपयांचा बंदी घालण्यात आलेला पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.