नागरीकांसाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ आता 'आठवड्यातून दोन दिवस'
पिंपरी, ता. ८ - महापालिकेमध्ये विविध कामांसाठी नागरीकांना अधिकाऱ्यांची भेट द्यायची असते. अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ आता आठवड्यातून केवळ दोनच दिवस आणि दोनच तास असणार आहे. महापालिकेचे नवीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा बदल लागू केला आहे.
निवडणूकीआधी प्रशासकीय राजवटीत तत्कालीन आयुक्त डॉ. शेखर सिंह यांनी नागरिकांना कामांसदर्भात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ६ ही वेळ निश्चित केली होती. मात्र, डॉ. सूर्यवंशी यांनी त्यात बदल केला आहे. आता, महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी उपलब्ध असल्यामुळे नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवल्या जात आहेत, असे डॉ. सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. .
महापालिकेतील अनेक अधिकारी-कर्मचारी 'साइट व्हिजिट'च्या नावाखाली दिवसभर कार्यालयाबाहेर जातात. सकाळी उपस्थिती लावली की थेट सायंकाळीच कार्यालयात येतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहावे व नागरीकांच्या कामांवर लक्ष केंद्रित करावी यासाठी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना भेटण्याच्या वेळेत बदल केला आहे.
महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे पालन करावे, वेळेवर कार्यालयात उपस्थित राहावे, कार्यालयीन वेळेनंतरच कार्यालयाबाहेर पडावे, नागरीकांच्या समस्यांचा फॉलोअप घ्यावा, वक्तशीरपणा राखावा, अशा सूचनाही आयुक्तांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
- , कार्यालयीन वेळ, Office Timing, शिस्त, Discipline
- प्रशासकीय बदल, Administrative Change
- आयुक्त निर्णय, Commissioner Decision,
- डॉ. विजय सूर्यवंशी, Dr Vijay Suryavanshi,
- आठवड्यातून दोन दिवस, Two Days a Week
- नागरिक, Citizens, अधिकारी भेट वेळ, Officials Meeting Time,
- Municipal Corporation, पिंपरी, Pimpri