केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरु राहील - अभिजीत दीपके

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरु राहील - अभिजीत दीपके

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरु राहील - अभिजीत दीपके

पुणे, ता. ८ - ''दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर झालेले आंदोलन शांततेत पार पडले आहे. हे आंदोलन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देईपर्यंत सुरु राहील आणि आता या आंदोलनात देशभरात विस्तार होईल. '', असे 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी सांगितले. 

अभिजीत दीपके रविवारी सकाळी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एमआयडीसी वाळूज परिसरातील आपल्या निवासस्थानी पोहोचले. तिथे कुटुंबियांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ''केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत 'कॉकरोच जनता पार्टी'चे  आंदोलन सुरु राहील. जंतर-मंतरवर आम्ही केलेले आंदोलन यशस्वी झाले. त्यात ६,००० ते ७,००० लोकांनी सहभाग घेतला. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही." हे आंदोलन देशभर विस्तारण्यासाठी एक कृती आराखडा तयार केला जाणार आहे, असे दीपके यांनी सांगितले. 

 केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना केंद्र सरकार प्रधान यांना पदावरुन दूर करते की ते स्वतःहून राजीनामा देतात, हे पाहण्यासाठी  एक आठवडा वाट पाहिली जाईल.  त्यानंतर देशभर आंदोलन सुरू केले जाईल, असे दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत CJP च्या प्रवक्त्त्यांनी सांगितले.  



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories