हातभट्टीच्या विषारी दारुमुळे फुगेवाडी व पुण्यातील मृत्यूंच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल

पिंपरी, ता. २९ - पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी व पुण्यातील हातभट्टीच्या विषारी दारुमुळे झालेल्या फुगेवाडी व पुण्यातील १३ जणांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे, ''ही घटना अतिशय गंभीर आहे. विषारी दारु म्हणजे एक प्रकारची हत्या आहे.'', अशी प्रतिक्रीया मुख्य फडणवीस यांनी दिली आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून तपास अधिक वेगाने सुरु आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.   

मुख्यमंत्री म्हणाले, ''ही घटना गंभीर आहे. या घटनेबाबत माझे पुणे पोलिस आयुक्तांशी बोलणे झाले आहे.  विषारी दारु कुठे तयार झाली हे पोलिसांनी शोधून काढलेले आहे. याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोक यात सामील असू शकतात. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.  ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल.''

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories