थेरगाव परिसरातून युवकाकडून ३९१५ ग्रॅम गांजासह ३ लाख ३० हजारांचा माल जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
थेरगाव परिसरातून युवकाकडून ३९१५ ग्रॅम गांजासह ३ लाख ३० हजारांचा माल जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी, ता. २९ - पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने थेरगाव परिसरातून एका युवकाकडून ३९१५ ग्रॅम गांजासह, १ मोबाईल व एक गाडी असा एकूण ३ लाख ३० हजार ७५०/- किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २७ मे रोजी पेट्रोलिंग करताना काळेवाडी पोलिस स्टेशन हद्दीत थेरगाव येथे संशयास्पद युवक आढळला. त्याच्याकडून ३९१५ ग्रॅम गांजा, १ मोबाईल, एक गाडी असा एकूण ३,३०,७५०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुध्द काळेवाडी पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब),२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक संतोष आडवाणी (वय २८ वर्षे, रा. पवनेश्वर कॉलनी, थेरगाव गावठान) असे केलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उप आयुक्त गुन्हे प्रदिप जाधव, सहा पोलिस आयुक्त, गुन्हे २ - प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक जिलानी मोमीन, पोलिस हवालदार/१७४५ सुषमा पाटील, पोलिस शिपाई/२०९८ सदानंद रूद्राक्षे, पोशि/२१३६ गोविंद डोके, पोशि २७१२ कपिलेश इगवे, पोशि/२४३० सुभाष गुरव यांचे पथकाने केली असून पोलिस अंमलदार सुभाष गुरव यांनी तांत्रिक विश्लेषणसाठी मदत केली आहे.