कंपनीतील मालाचा कामगारांकडून अपहार
पिंपरी, ता. 23 - कंपनीत तयार झालेल्या मला पैकी नऊ लाख 45 हजार रुपयांच्या मालाचा दोन कामगारांनी संगनमताने अपहार केला आणि त्या मालाची विक्रीही केली. हा प्रकार एमआयडीसी भोसरी परिसरात इंडियन पॉलिमर्स या कंपनीत १/०७/२०२४ रोजी ते ३१/१२/२०२५ या कालावधीत घडला आहे.
याबाबत, कंपनीचे मालक अशोककुमार मिठालाल जैन (वय ५३ वर्षे, रा. चिंचवड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
आरोपी कामगार, मिलींद श्रीपाद कुलकर्णी (वयः-५८ वर्षे रा. पिंपळे गुरव) व भगवान सुंदरराव लिंगायत (वयः ४० वर्षे, रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(४),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
फिर्यादी जैन यांच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगार आरोपींनी संगनमत करुन कंपनीतील तयार झालेल्या मालातील ९,४५,२४९/- रुपये किंमतीच्या मालाचा अपहार केला व त्या मालाची विक्री करुन त्यातून मिळालेल्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करुन फिर्यादी जैन त्यांची फसवणूक केली. मालाचा अपहार त्यांनी त्यांचा मित्र गुरुप्रसाद पाटील याच्या मदतीने केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.