बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर चाफेकर चौक व एमआयडीसी भोसरी परिसरात वाहतूकीत तात्पुरते बदल
पिंपरी, ता. २३ - बकरी ईद निमित्त चाफेकर चौक-चिंचवड येथील ईदगाह मैदान येथे नमाज पठण करण्याकरीता मोठ्या प्रमाणात नागरीक येत असल्याने ईदगाह मैदानाकडे जाणारी व तेथून येणारी वाहतूक २८ व २९ मे रोजी पर्यायी रस्त्याने वळविण्यात येत आहे तसेच चिखली वाहतुक विभागाचे हददीत वाहतूकीत तात्पुरते बदल करण्यात येत आहेत. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केले आहेत.
आदेशात सांगितले आहे की, बकरी ईद निमित्त चाफेकर चौक-चिंचवड येथील ईदगाह मैदान येथे नमाज पठण करण्याकरीता मोठ्या प्रमाणात नागरीक येतात.
तसेच चिखली वाहतुक विभागाचे हददीत बकरी ईदचे अनुषंगाने पिंपरी चिंचवड मनपा कडून उभारण्यात आलेला तात्पुरता कत्तलखाना हा पाळीव प्राणी चिरंतन भूमी पाठीमागे, हॉकी स्टेडियम चौक, एमआयडीसी भोसरी येथे आहे. त्याठिकाणी जनावरांची खरेदी विक्री व मांस घेवून जाण्याकरीता व्यापारी, ग्राहक व मुस्लिम बांधव आपल्या वाहनांनी सदर ठिकाणी येत असतात. त्यामुळे सदर परीसरात वाहनांची गर्दी होत असते.
वरील सदर परिसरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी दिनांक-२८/०५/२०२६ रोजी सकाळी ६.०० ते दिनांक २९/०५/२०२६ रोजी ९.०० वा दरम्यान शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच कत्तलखान्याकडे जाणारी वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांस त्या परिसरात प्रवेश बंदी असेल. नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक मार्गातील बदल असे ...................
निगडी वाहतुक विभाग
मरीआई माता मंदिर ते चाफेकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे
पर्यायी मार्ग १: एस के एफ कंपनीकडुन डावे बाजुस वळुन अहिंसा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग २:- मरीआई माता मंदीरपासून उजवे बाजूस वळून सेव्हन ऑरेंज हॉस्पीटलमार्गे इच्छितस्थळी जातील.
चाफेकर चौक ते मरीआई माता मंदिर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग १:- सदर मार्गावरील वाहतुक ही चाफेकर चौक जुना जकात नाका कडुन उजवे बाजुस वळुन सेव्हन ऑरेंज हॉस्पीटल मार्गे इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग २:- सदर मार्गावरील वाहतुक ही चाफेकर चौक कडुन उजवे बाजुस वळुन अंहिसा चौक कडुन इच्छित स्थळी जाईल.
मोरया नगर ते चाफेकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
हनुमान मंदिर पासून उजवे बाजूस वळून सेव्हन ऑरेंज हॉस्पीटलमार्गे इच्छित स्थळी जातील.
तरी वरील प्रमाणे वाहतुक बदल हा दि.२७/०५/२०२६ रोजी सकाळी ०५.०० ते १७.०० वा. दरम्यान आवश्यकतेनुसार (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) अथवा वाहतुक सुरळीत होईपर्यंत वाहतुक बदल करण्यात येत असुन नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
चिखली वाहतुक विभाग
हॉकी स्टेडियम चौकामधुन गुलाब पुष्प उदयान चौकापर्यंत जाण्या येण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग १:- नेहरुनगर कडून येणारी वाहने हॉकी स्टेडियम चौकाकडून क क्षेत्रिय प्रभाग कार्यालयाकडे जाऊन बीएचटीसी कंपनी समोरुन डावीकडे वळून गुलाब पुष्प उदयान चौकातुन इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग २. गुलाब पुष्प उदयान चौकातुन हॉकी स्टेडियमकडे येणारी वाहने ही गुलाब पुष्प उदयान चौकातुन डावीकडे वळून-बीएचटीसी कंपनी समोरुनक प्रभाग कार्यालय मार्गे इच्छित स्थळी जातील.