news
clock
पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी  ४ मार्च ते ६ मार्च दरम्यान चिंचवडमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम

पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी ४ मार्च ते ६ मार्च दरम्यान चिंचवडमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम

पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी  ४ मार्च ते ६ मार्च दरम्यान चिंचवडमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम

पिंपरी, ता. ४ - पुणे जिल्हा सहकारी बोर्ड आणि राज्य सहकारी संघाच्या शैक्षणिक धोरणांतर्गत पगारदार पतसंस्थांच्या पदाधिकारी, संचालक आणि सेवकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम ४ मार्च ते ६ मार्च दरम्यान, सकाळी १० ते दुपारी चार या वेळेत चिंचवड येथील एस.के.पी. इंडिया एम्प्लॉईज युनियन हॉल येथे होणार आहे.

सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल, तर सुनील आव्हाळे अध्यक्षस्थानी आहेत. हिरामण सातकर, मिलिंद सोबळे, श्रीधर वाल्हेकर, नागनाथ कुंजीरे, मुकुंद पवार, मोहन जगताप, साजिद पठाण, देवेंद्र घोडके, आणि अॅड. अजित बोराडे मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशिक्षणात पगारदार सहकारी पतसंस्थांसाठी मार्गदर्शन केले जाईल. पहिल्या दिवशी कलम १४४ आणि विविध शासकीय परिपत्रकांविषयी माहिती दिली जाईल. तसेच निधी व्यवस्थापन आणि लेखापरीक्षण गुणांकन या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल. दुसऱ्या दिवशी पतसंस्थांच्या व्यवस्थापनाच्या सूत्रांबाबत तसेच कर्जवाटप आणि कर्जवसुली संदर्भातील संचालक मंडळाची जबाबदारी यावर चर्चा होईल. तिसऱ्या दिवशी संस्थाभेट, समारोप आणि प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम होईल, असे संयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories