news
clock
संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त गुरुवारी देहूमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त गुरुवारी देहूमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त गुरुवारी देहूमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी, ता. ४ -  जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांचा ३७८ वा बीज उत्सव सोहळा गुरुवारी (दि. ५) वारकरी परंपरेनुसार श्रीक्षेत्र देहू येथे साजरा होणार आहे. त्यानिमित्त जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी दिली.

दिनांक २६ फेब्रुवारीला नामस्मरण सप्ताहाने बीज सोहळ्याची सुरुवात झाली आहे. गुरुवारी (ता. ५) बीज सोहळ्यास पहाटे तीन वाजता काकड आरती आणि पहाटे चार वाजता अध्यक्ष व विश्वस्त यांच्या हस्ते श्रींची महापूजा, शिळा मंदिरात महापूजा होईल. सकाळी आठ वाजता वैकुंठगमनस्थळी महापूजा होणार असून, सकाळी १० वाजता वैकुंठगमन प्रसंगावर कीर्तन होईल. सकाळी ११ : २० वाजता मुरली मंदिरातून श्रींची पालखी वैकुंठगमन स्थळ गोपाळपुराकडे प्रस्थान करेल. 

रविवारी (दि. ८) रंगपंचमीनिमित्त व सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत वैकुंठगमनस्थळी कीर्तन होईल. मंगळवारी (दि. १०) सकाळी १० वाजता देहूकर महाराज यांचे कीर्तन होईल. बुधवारी (दि. ११) रात्री १० वाजता पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी निघेल. दुसऱ्या दिवशी महाप्रसाद होईल, असे मोरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories