news
clock
सेफ्टी कटर ब्लेडने सहकर्मचाऱ्याला केली दुखापत, महाळुंगे येथील घटना

सेफ्टी कटर ब्लेडने सहकर्मचाऱ्याला केली दुखापत, महाळुंगे येथील घटना

सेफ्टी कटर ब्लेडने सहकर्मचाऱ्याला केली दुखापत, महाळुंगे येथील घटना 

पिंपरी, ता. ११ -  हरमन इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनी, महाळुंगे येथे कामाच्या ठिकाणी सहकर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एका कामगारावर सेफ्टी कटर ब्लेडने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी २० वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी प्रविण शशीराव राठोड (वय २२, रा. बालाजीनगर, चाकण) हे कंपनीत काम करत असताना आरोपी साईप्रसाद अनिल खेळगे (वय २०, रा. भाड्याच्या खोलीत, भैरवनाथनगर, महाळुंगे) याने चेष्टा-मस्करीदरम्यान हातातील सेफ्टी कटर ब्लेडने फिर्यादी राठोड यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी फिर्यादीने विरोध करत स्वतःची पॅन्ट व टी-शर्ट फाडू नये असे सांगितले असता आरोपीने पुन्हा पॅन्ट फाडली. त्यावर दोघांमध्ये झटापट झाली. रागाच्या भरात आरोपीने सेफ्टी कटर ब्लेडने फिर्यादीच्या नाकावर व ओठावर वार करुन जखमी केले तसेच शिवीगाळ व धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी आरोपीविरोधात महाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५१ (२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories