'सायक्लॉथॉन' सायकल स्पर्धेसाठी निगडी-प्राधिकरण परिसरात शुक्रवारी वाहतूकीत बदल

'सायक्लॉथॉन' सायकल स्पर्धेसाठी निगडी-प्राधिकरण परिसरात शुक्रवारी वाहतूकीत बदल

 'सायक्लॉथॉन' सायकल स्पर्धेसाठी निगडी-प्राधिकरण परिसरात शुक्रवारी वाहतूकीत बदल  

पिंपरी, ता. ४ -  पिंपरी-चिंचवड महापालिका व भारतीय खेल प्राधिकरण यांच्या वतीने उद्या, शुक्रवारी (ता. ५) निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीत सायक्लॉथॉन ही सायकल स्पर्धा आयोजिली आहे. यामध्ये  मोठ्या प्रमाणात सायकलस्वार सहभागी होणार आहेत. सदर सायकल रॅलीस अडथळा होऊ नये तसेच इतर वाहतूकदेखील सुरळीत सुरु राहावी यासाठी स्पर्धा मार्गाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिले आहेत.

आदेशानुसार, शुक्रवारी (ता. ५) सकाळी ५ ते ९ या वेळेत रॅलीच्या नियोजित मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस आवश्यकतेनुसार अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत मनाई केली आहे. नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. 

प्रवेश बंद करण्यात येणारा मार्ग व पर्यायी मार्गांचा तपशील पुढीलप्रमाणे - 

१) बिजलीनगर चौक येथून संभाजी चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

सदरची वाहने हि बिजली नगर कडुन डावी कडेवळुन गुरुद्वारा चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.


२) कृष्णा पावभाजी पंक्चर व गुरुव्दारा चौक बोगदया जवळील पंक्चर येथून आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

आकुर्डी रेल्वे स्टेशनकडुन कृष्णा पावभाजी कडे जाणारी वाहने गुरुद्वारा चौक बोगद्याकडुन इच्छित स्थळी जातील.


३) केरळाभवन पंक्चर येथून के सदन चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

आकुर्डी चौकीकडे जाणा-या रोड कडुन इच्छित स्थळी जातील.


४) धर्मराज चौक येथून के सदन चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

धर्मराज चौकाकडून डावीकडे व उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील


५) पी.सी.सी. कॉलेज पंक्चर येथून के सदन चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

पी.सी.सी कॉलेजकडून यु-टर्न करुन नविन धर्मराज ब्रिजकडे इच्छित स्थळी जातील.


६) बिग इंडीया चौक येथून हुतात्मा चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

बिग इंडीया चौकाकडुन वाहतुक अप्पुघर कॉर्नर व भेळ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.


८) पाटीदार भवन पंक्चर येथून हुतात्मा चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

गणेश तलावाकडुन येणारी वाहतुक ही हुतात्मा चौकाडे न येता ती पाटीदार भवनकडून नविन धर्मराज ब्रिजकडे इच्छित स्थळी जातील.


९) पोस्ट आफिस पंक्चर येथून हेगडेवार भवनकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

पोस्ट आफिसकडुन धन्वतरी हॉस्पीटलकडुन इच्छित स्थळी जातील.


१०) रोटरी क्लब चौक येथून संभाजी चौककडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

भेळ चौकाकडुन येणारी वाहतुक ही रोटरी क्लब मार्गे इच्छित स्थळी जातील.


११) नॅशरल सुपर मार्केट गंगानगर रोड येथून म्हाळसाकांत चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

नॅशरल सुपर मार्केट गंगानगर रोडकडुन आकुर्डी रेल्वे स्टेशन किवा दळवीनगर ब्रिजकडे जातील.


१२) अमरदिप स्वीट पंक्चर येथून म्हाळसाकांत चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

अमरदिप स्वीट पंक्चर कडुन उजवीकडुन वळुग इच्छित स्थळी जातील.


१३) आकुर्डी भाजी मंडई रोड येथून आंबेडकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

सदरची वाहने हि ओम शिवम डेअरीकडुन बजाज अंडरपास मार्गे इच्छित स्थळी जातील.


१४)  विठ्ठल मंदिर समोरील चौक येथून आंबेडकर चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे. 

सदरची वाहने हि विठठल मंदिर कमानीकडुन उर्सेला शाळेमार्गे इच्छित स्थळी जातील.


१५)  खंडोबामाळ चौक येथून टिळक चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

१) थरमॅक्स चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

२) दळवीनगर ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जातील.


१६)सावली हॉटेल येथुन टिळक चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

१) मल्हार हॉटेल मार्गे इच्छित स्थळी जातील.


१७) एस बी आय पंक्चर येथून भक्त्ती शक्ती ब्रिजकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

१) सदरची वाहने हि भक्ती शक्ती ओव्हर ब्रिजवरुन देहूरोडच्या दिशेने इच्छित स्थळी जातील.


१८) भक्ती शक्ती सर्कल येथून अप्पुघरकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

सदरची वाहने भक्ती शक्ती सर्कलकडुन डाये बाजुने टिळक चौक मार्गे इच्छित स्थळी जातील


१९) संत निरकांरी भवन पंक्चर येथून अंकुश चौक ग्रेड सेप्रेटरमधुन जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

१) सदरची वाहने हि अप्पुघर कडुन उजवीकडे वळून बिग इंडिया मार्गे इच्छित स्थळी जातील.








Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories