'सायक्लोथॉन' सायकल स्पर्धेसाठी रविवारी सांगवी-वाकड परिसरातील वाहतूक मार्गांत तात्पुरते बदल

'सायक्लोथॉन' सायकल स्पर्धेसाठी रविवारी सांगवी-वाकड परिसरातील वाहतूक मार्गांत तात्पुरते बदल

  'सायक्लोथॉन' सायकल स्पर्धेसाठी रविवारी सांगवी-वाकड परिसरातील वाहतूक मार्गांत तात्पुरते बदल 

पिंपरी, ता. ५ -  भारतीय खेल प्राधिकरणातर्फे  'संडे ऑन सायकल' या उपक्रमांतर्गत सांगवी, वाकड, देहूरोड वाहतूक विभागाच्या हद्दीत 'सायक्लोथॉन स्पर्धा' होणार आहे. या सायकल स्पर्धेला कोणताही अडथळा होऊ नये तसेच इतर वाहतूकदेखील सुरळीत सुरु राहावी यासाठी स्पर्धा मार्गाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.  त्याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी जारी केले आहेत. 

सदर सायकल स्पर्धा राजीव गांधी ब्रीज ते जगताप डेअरी चौक तसेच काळेवाडी फाटा-पुनावळे औंध रावेत बीआरटी रस्त्यावरुन मुकाई चौक, अंकुश चौक व त्याच मार्गे परत अशी असणार आहे.

त्यानुसार, रविवारी, दिनांक ७ जून २०२६ रोजी सकाळी ५:३० ते १०:३० वाजेपर्यंत स्पर्धेच्या नियोजित मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस आवश्यकतेनुसार मनाई करणेत येत आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा व वाहतूक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. 

प्रवेश बंद करण्यात येणारे मार्ग आणि  पर्यायी मार्ग......

१) ढोरे पाटील अंडरपासकडून डिमार्टकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

राजीव गांधी ब्रीजवरुन ब्रेमन चौकातुन पर्यायी मार्गाने इच्छीत स्थळी जातील.


२) ब्रेमन चौकाकडून ढोरे पाटील अंडरपास मार्गे डी मार्ट बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

वाहने ब्रेमन चौकातुन पर्यायी मार्गे इच्छीत स्थळी जातील.


३) शिवार चौकाकडून काळेवाडी चौकाकडे जाणारे वाहतुकीस जगताप डेअरी मार्गे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

शिवार चौकाकडून काळेवाडी फाटयाकडे जाणारी वाहतूक ही जगताप डेअरी अंडरपास मार्गे सावीत्रीबाई फुले उदयान येथे यु टर्न करुन जगताप डेअरी चौकात सर्वीस रोडने डाव्या बाजूने टर्न करुन काळेवाडी फाटा येथे जाईल.


४) कस्पटे चौकाकडून जगताप डेअरी चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

कस्पटे चौकाकडून येणारी वाहतूक जगताप डेअरी अंडरपास मार्गे शिवार इच्छीत स्थळी जाईल.  


५) काळा खडक बाजूकडुन डांगे चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

डांगे चौक अंडरपास मार्गे थेरगावफाटा येथून इच्छीत स्थळी जातील.


६) बिर्ला हॉस्पीटलकडून डांगे चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

बिर्ला हॉस्पीटलकडून येणारी वाहतुक डांगे चौक अंडरपास मार्गे इच्छीत स्थळी जातील.


७) भक्त्ती शक्त्ती चौकाकडुन किवळे ब्रिजकडे येणारी वाहतूक मुकाई चौक येथे बंद करण्यात येत आहे.

वाहने मस्के वस्ती चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.








Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories