पुणे महानगरपालिकेतर्फे अवघ्या ५ रुपयांत मिळणार स्थानिक प्रजातींची रोपे
पिंपरी, ता. ५ - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिका वृक्ष प्राधिकरण विभाग नागरीकांसाठी असंख्य रोपे स्वस्त दरात उपलब्ध करुन देत आहे. या वनमहोत्सवाचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
या वनमहोत्सवात स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची रोपे नागरीकांना स्वस्त दरात म्हणजे पाच रुपये प्रति रोप या दराने दिली जाणार आहेत. दिनांक ४ जून ते १४ ऑगस्ट या कालावधीत पुण्यातील बांलगंधर्व रंगमंदिराशेजारी छत्रपती संभाजी उद्यानात सकाली ८ ते सायंकाळी ५ या वेळेत रोपे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही विक्री बंद राहणार आहे. अधिकाधिक नागरीकांनी वनमहोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.