श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा गुरुवारी चिंचवडमध्ये बक्षीस समारंभ
श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा गुरुवारी चिंचवडमध्ये बक्षीस समारंभ
पिंपरी-चिंचवड विभागासाठी एकूण १४ लाख २० हजार रुपयांची पारितोषिके, शहरातील ७ मंडळांना 'जय गणेश भूषण पुरस्कार' जाहीर
पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा पिंपरी-चिंचवड विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. शहरातील ७ मंडळाना 'जय गणेश भूषण पुरस्कार' जाहीर झाला आहे. गतवर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड विभागामध्ये एकूण २९५ मंडळे सहभागी झाली होती. त्यातील १२३ मंडळांनी पारितोषिक जिंकले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या एकूण १४ शाळांपैकी सात शाळांनी पारितोषिक जिंकले आहे आणि सहभागी झालेल्या २५ सोसायटींपैकी ११ सोसायटी बक्षीसपात्र ठरल्या आहेत. सर्व पारितोषिक विजेत्यांना एकूण १४ लाख २० हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. हा बक्षीस समारंभ येत्या गुरुवारी, १३ ऑगस्टला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने सोमवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आणि पदाधिकारी उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत प्रतिवर्षी शहातील अनेक मंडळे, शाळा, गृहरचना संस्था सहभागी होतात. स्थिर व हलता देखावे, जिवंत देखावे, सामाजिक-प्रबोधनपर-वैज्ञानिक-पर्यावरणपूरक देखावे, पौराणिक देखावे, आकर्षक विद्युत रोषणाई केलेले देखावे अशा विविध विभागांमध्ये पारितोषिके दिली जातात. महोत्सवी वर्ष असलेल्या मंडळांनाही गौरवण्यात येते.
गतवर्षीच्या स्पर्धेत शहरातील ७ मंडळाना जय गणेश भूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार विजेत्या मंडळांची नावे - जय बजरंग तरुण मंडळ (निगडी), जय हिंद मित्र मंडळ ट्रस्ट (प्राधिकरण, निगडी), लांडगे लिंबाची तालीम मंडळ (भोसरी गावठाण), पठारे लांडगे तालीम मित्र मंडळ (भोसरी), गांधी पेठ तालीम मित्र मंडळ (चिंचवड), एस. के. एफ. मित्र मंडळ (चिंचवड), राष्ट्रतेज तरुण मंडळ (काळभोरनगर)
----
प्रथम पाच क्रमांकाची विजेती मंडळे -
प्रथम क्रमांक - कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळ, भोसरी (बक्षीस - रुपये ५१,०००/-)
द्वितीय क्रमांक - सुवर्णयुग मित्र मंडळ, पिंपरी (बक्षीस ४५,०००/-)
तृतीय क्रमांक - समस्त गव्हाणे तालीम भोसले मंडळ, भोसरी (बक्षीस ३५,०००/-)
चौथा क्रमांक - छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, पिंपळे गुरव - (बक्षीस ३०,०००/-)
पाचवा क्रमांक - समता मित्र मंडळ, आकुर्डी (बक्षीस २५,०००/-)
----
पारितोषिक विजेत्या शाळा -
ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी-प्राधिकरण - (बक्षीस २५,०००/-)
बाबूरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय - (बक्षीस २०,०००/-)
केंब्रिज स्कूल, आकुर्डी - (बक्षीस १५,०००/-)
नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय - (बक्षीस १०,०००/-)
प्रेरणा हायस्कूल, थेरगाव - (बक्षीस ७,०००/-)
शकुंतला अनंतराव शितोळे हायस्कूल - (बक्षीस ५,०००/-)
पी. डी. ई. इंग्लिश मिडीयम स्कूल, आकुर्डी - (बक्षीस ५,०००/-)
---
हाउसिंग सोसायटी मंडळे - (बक्षीस ७,०००/- प्रत्येकी)
स्वप्नपूर्तीचा राजा गणेश मित्र मंडळ, प्राधिकरण
शुभम पार्क सोसायटी, प्राधिकरण
शुभारंभ हाउसिंग सोसायटी, चिखली
स्वराज्य ग्रुप सोसायटी, मोरवाडी
लोकमान्य युवक मित्र मंडळ सोसायटी, अजमेरा कॉलनी
एफ टाईप बिल्डींग, भोसरी
मंगल विश्व सोसायटी, रावेत
सेलेस्टियल सिटी फेज १, रावेत
साईराज रेसिडेन्सी, नवी सांगवी
डी. के. एलीगन्स, रावेत
साई स्नेह, नवी सांगवी
---
महोत्सवी मंडळे - (बक्षीस ५,०००/- प्रत्येकी)
उज्ज्वल मित्र मंडळ, शिवराज्य ग्रुप, पिंपरी
शिवाजी तरुण मंडळ, सांगवी
मयुरेश मित्र मंडळ, चिंचवड
सौंदर्य मित्र मंडळ, पिंपरी
श्रीरामभक्त हनुमान मित्र मंडळ, रुपीनगर
सिद्धीविनायक मित्र मंडळ, आकुर्डी