हातभट्टीच्या दारुसह ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त, दापोडीमधील कारवाई
पिंपरी, ता. १ - दापोडी परिसरात अवैधरित्या हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध दापोडी पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास विश्वासे चाळ, वार्ड क्रमांक ३, जयभीमनगर, दापोडी येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपी सचिन बंकट कांबळे (वय ३२) आणि सुमित रमेश घुमे (वय ३७, दोघेही रा. विश्वासे चाळ, जयभीमनगर, दापोडी) हे अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू जवळ बाळगून विक्री करताना आढळून आले.
पोलिसांनी आरोपींकडून हातभट्टीची दारू, रोख रक्कम व इतर मुद्देमाल असा एकूण ६१ हजार ६६० रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई सुशांत संपत फुंदे यांनी फिर्याद दिली असून दापोडी पोलीस ठाण्यात १ जून २०२६ रोजी पहाटे १२.५३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी सुमित रमेश घुमे यास बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.