पिंपरी व पुण्यात विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणाची  सखोल आणि कडक चौकशी करावी

पिंपरी व पुण्यात विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणाची सखोल आणि कडक चौकशी करावी

पिंपरी व पुण्यात विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणाची  सखोल आणि कडक चौकशी करावी,  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रशासनाला आदेश 

पिंपरी, ता.‌  29 - पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात व पुण्यातील हडपसरमध्ये विषारी दारू प्यायल्याने 13 नागरिकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या प्रकरणाची सखोल आणि कडक चौकशी करण्याचे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. दोषींची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने पुणे व पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी थेट संपर्क साधला.

या घटनेचा सखोल तपास करुन, अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या लहान-मोठ्या सर्वच घटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा कडक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

 आतापर्यंत या प्रकरणात ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अत्यंत वेगाने आणि संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास सुरु आहे, असे पवार यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories