‘कर्णबधिर क्रिकेट - जीवनगौरव पुरस्कार’ विजेते विवेक माळशे यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान
‘कर्णबधिर क्रिकेट - जीवनगौरव पुरस्कार’ विजेते विवेक माळशे यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान
पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ - आग्रा येथे आयोजित दिव्यांग क्रिकेट पुरस्कार २०२६ सोहळ्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी विवेक माळशे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार - कर्णबधिर क्रिकेट’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या अभिमानास्पद सन्मानाबद्दल महापौर रवी लांडगे हस्ते विवेक माळशे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कॅप्टन राहुल चावरिया आणि ओंकार पवार उपस्थित होते.
महापालिकेच्या सेवेसोबतच महापालिकेच्या क्रिकेट संघाला प्रशिक्षण व मार्गदर्शन देत त्यांनी अनेक खेळाडूंना घडविले आहे. कर्णबधिर व दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या क्रीडा प्रवासाला बळ देण्याचे त्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.
''विवेकजी, या मानाच्या सन्मानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या कार्यातून अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळत राहो आणि पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा क्षेत्राची मान अशीच उंचावत राहो, हीच सदिच्छा.'', अशी भावना महापौरांनी व्यक्त केली.
- Sports Felicitation, Disability Sports, Vivek Malshe, Rahul Chavariya, Omkar Pawar
- Deaf Cricketer, Differently Abled Sports, Cricket Coaching, Cricket Team, Sports Award
- प्रेरणादायी कार्य, कॅप्टन राहुल चावरिया, ओंकार पवार, Deaf Cricket, Lifetime Achievement Award, Deaf Cricket Lifetime Achievement Award, Divyang Cricket Awards 2026
- महापौर रवी लांडगे, कर्णबधिर खेळाडू, दिव्यांग खेळाडू, क्रिकेट प्रशिक्षण, क्रिकेट संघ, क्रीडा क्षेत्र, खेळाडूंचा सन्मान, दिव्यांग क्रीडा
- विवेक माळशे, कर्णबधिर क्रिकेट, जीवनगौरव पुरस्कार, दिव्यांग क्रिकेट पुरस्कार २०२६