रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीची आरटीओ प्रशासनासोबत यशस्वी बैठक; १५ ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित

रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीची आरटीओ प्रशासनासोबत यशस्वी बैठक; १५ ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित

 रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीची आरटीओ प्रशासनासोबत यशस्वी बैठक; १५ ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित

पिंपरी, ता. ११ ऑगस्ट २०२६ - महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि विविध रिक्षा, टॅक्सी व कॅब चालक-मालक संघटनांच्या वतीने पिंपरी व पुणे प्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालयावर एक भव्य व तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. 'टू व्हीलर टॅक्सी'चा तीव्र विरोध, 'पिंक रिक्षा' योजनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी आणि रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलनादरम्यान आरटीओ प्रशासनाने तातडीने दखल घेत शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले. पिंपरी-चिंचवडच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत तब्बल दोन तासांहून अधिक काळ ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीत महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. 

 आरटीओ स्तरावर प्रलंबित असलेले सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.  धोरणात्मक प्रश्न शासनाकडे: जे प्रश्न व मागण्या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित आहेत (उदा. टू व्हीलर टॅक्सी, पिंक रिक्षा टेंडर आणि अ‍ॅग्रीगेटर पॉलिसी), ते प्रस्ताव तातडीने वरिष्ठ पातळीवर व शासनाकडे पाठवण्याबाबत बैठकीत एकमत झाले.

या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ठरलेले आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले असून, १५ ऑगस्टपर्यंत बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पूर्तता न झाल्यास, १५ ऑगस्टनंतर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.

बैठकीस प्रशासकीय अधिकारी: उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी, मोटर वाहन निरीक्षक अमोल मालठाणे,  कसबे, अभिजीत तरकसे, प्रशासकीय अधिकारी मनोज बागमार, कर्मचारी अमोल सदरे, विवेक भास्कर, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष शुभम तांदळे, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष नाना गुंडे, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विजय ढगारे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक तात्या ठाकूर, पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष दीपक ताटे, पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष विशाल ससाने, पिंपरी-चिंचवड शहर प्रसिद्धी प्रमुख नामदेव मेहर, आळंदी रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष दत्ता पगडे, पुनावळे विभाग अध्यक्ष सोमनाथ शिंदे, पुनावळे विभाग उपाध्यक्ष सोमनाथ आवारे, सुनील चाटे, नाना ढगे, युवराज पठारे, प्रकाश कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व चालक-मालक उपस्थित होते.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories