news
clock

देहूगाव येथे पीएमपीएमएल बसची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू

पिंपरी, ता. ६ - देहूगाव (ता. हवेली) येथे भरधाव 'पीएमपीएमएल' बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (ता. ५) दुपारी अडीचच्या सुमारास देहूगाव येथे भैरवनाथ चौक ते काळुखे चौक परिसरात घडला आहे. पीएमपी बसचालकाविरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, विजय रामलिंग विभुते (वय ३२ वर्षे, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे काका त्रिंबक विश्वनाथ विभुते (वय ६९, रा. पाटील नगर, चिखली) हे त्यांच्या दुचाकीवरून पत्नी भागीरथी त्रिंबक विभुते यांच्यासह देहूगाव येथून चिखलीकडे जात होते. 

तेव्हा, भैरवनाथ चौक ते काळुखे चौक परिसरात पीएमपीएमएल बसचा (क्र. MH14/HU/5037) चालक अण्णासाहेब महादेव गवते (वय ४३, रा. धर्मराजनगर, चिखली) याने भरधाव वेगाने बस चालवित दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात भागीरथी विभुते यांना उजव्या पायाला तसेच डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली, त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला झाला. उपचारादरम्यान भागिरथी यांचा मृत्यू झाला.

बसचालकाविरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात बस चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ)(ब), १०६ (१), ३२४ (२) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories