news
clock

बनावट स्वच्छता उत्पादन विक्रीसाठी ठेवणाऱ्या दोघांना बजावली नोटीस   

पिंपरी, ता. ६ -   बनावट स्वच्छता उत्पादनाचा साठा विक्रीसाठी ठेवणाऱ्या दोघांना चिंचवड पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ३४ हजार ४२० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (ता. ५) केली आहे. 

या प्रकरणी धरमवीर अमरनाथ धल्लोड (वय ४०, रा. शितलानगर, मामुर्डी, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. या गैरव्यवहाराच्या घटनेत हिराराम गिरीधारीलाल चौधरी (वय ४२ वर्षे. रा. चिंचवडेनगर, चिंचवड) व विष्णुकुमार खंगाराम चौधरी (वय ३३ वर्षे, रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, चिंचवड) व  गजेंद्र शेरसिंग जव्हेरी (वय-३८वर्षे, रा. संगमनेर, अहिल्यानगर) हे तीन आरोपी आहेत.  

वाल्हेकरवाडी रस्त्यावर एम. के. इंटरप्रायजेस आणि  चिंचवड येथील चौधरी मार्केटिंग गोदामात 

आरोपींनी Reckitt Benckiser India Private Limited या कंपनीचे Harpic या उत्पादनाचा एकूण १ लाख ३४ हजार ४२०/- किंमतीचा बनावट माल विक्रीसाठी बाळगला होता. हा माल आरोपी हिराराम व विष्णुकुमार यांनी आरोपी गजेंद्र जव्हेरी याच्याकडून खरेदी केला होता.  

आरोपींविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ५) भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३ (५), कॉपी राईट कायदा १९५७ चे कलम ५१ (व), ६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना नोटीस बजावली आहे. एका आरोपीचा शोध सुरु आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories